दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवाल लढविणार

नवी दिल्ली दि.१६ – चालू वर्षाच्या अखेरीस होत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत उतरण्याचा निर्णय आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी घेतला असल्याचे पक्षाचे प्रवक्ते मनीष सिसोदिया यांनी सांगितले. अन्य कोण कोण ही निवडणूक लढविणार आहे त्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही तसेच  केजरीवाल यांचा मतदारसंघ कोणता याचाही निर्णय अदयाप झालेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिल्लीतील ७० मतदारसंघात आम आदमी पार्टी उमेदवार उभे करणार आहे. मात्र हे उमेदवार कोण असावेत यासाठी नागरिकांकडूनच सूचना मागविल्या जात आहेत. नागरिकांनी पसंती दिलेल्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेवारांची यादी तयार करण्यात येणार असून त्यातून पक्षाची स्क्रीनिग कमिटी प्रत्येक मतदारसंघासाठी पाच उमेदवार निवडेल. त्यानंतर त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातून अंतिम उमेदवार निवडले जातील असे सांगून सिसोदिया म्हणाले की एकाच कुटुंबातील दोन जणांना उमेदवारी दिली जाणार नाही. उमेदवार निवडीचे काम आत्तापासूनच सुरू केले असून नागरिकांनी त्यांच्या सूचना पाठविण्याची अंतिम मुदत ५ मे ही आहे.

Leave a Comment