तिसरा कार्यकाल स्वीकारण्याचा पर्याय पंतप्रधानांकडून खुला

नवी दिल्ली दि.१६ – सलग तिसरा कार्यकाल स्वीकारण्याचा पर्याय खुला ठेवला असल्याचे स्पष्ट संकेत आज पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिले. त्याचवेळी लोकसभेच्या निवडणुका मुदतीपूर्वीच होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.
येथे झालेल्या एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी वरील संकेत दिले.

पदाचा तिसरा कार्यकाल स्वीकारणार का, या प्रश्नानवर ते उत्तरले, माझा आताचा कार्यकाल संपण्यास अजून काही अवधी आहे. एका प्रश्नााच्या उत्तरादाखल ते म्हणाले, भारतासारख्या मोठ्या देशाचे पंतप्रधानपद भूषवणे ही अतिशय सन्मानाची बाब आहे. या पदावर सक्रिय असताना केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील जनतेच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्याच्या तयारीबाबत काही बोलण्यास त्यांनी नकार दर्शवला. त्याचवेळी केंद्र सरकार पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्वाासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment