सलमानच्या प्रशसकासाठी गुड न्युज

बॉलीवूडचा टायगर सलमान खानच्या फॅन्ससाठी सध्या खुशखबर आहे. येत्या काळात सलमान खानचा एकही सिनेमा रिलीज होणार नाही असे म्हटले जात होते. त्यामुळे हे वर्ष सलमानच्या सिनेमाशिवाय जाणार असे वाटत होते. मात्र त्याच्या प्रशंसकासाठी गुड न्युज असून त्याचा ‘मेंटल’ हा सिनेमा यावर्षीच रिलीज होणार आहे.

यापूर्वी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी जानेवरी महिन्यात ‘मेंटल’ हा सिनेमा यावर्षीच रिलीज होणार होता. त्यामुळे २०१३ या वर्षात एक पण सिनेमा रिलीज होणार नाही असे वाटत होते. नुकतीच सोहेलने सल्लूच्या फैन्ससाठी खुशखबरी दिली आहे. सोहेल म्हणाला,’ माझा सिनेमा वेळेवर रिलीज होणार आहे. या सिनेमाचे शूटिंग लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा या वर्षीच रिलीज होणार आहे.’

‘मेंटल’ सिनेमाची शुटींग सध्या पुणे जवळच्या लवासामध्ये होत आहे. सलमानला पण यावर्षी हा सिनेमा पूर्ण करायचा आहे. त्यामुळेच त्याने सोहेलला सिनेमाची शूटिंग लवकर पूर्ण करण्यास सांगितली आहे.