लता मंगेशकरांनाही झाला पश्चात्ताप

मुंबई: हल्लीची मराठी नाटकं पाहण्यासारखी मुळीच नसतात, या आपल्या विधानानंतर राज्यात गदारोळ उडलेला पाहताच विख्यात पार्श्‍वगायिका लता मंगेशकर यांना उपरती झाली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपण केलेलं विधान हे सरसकट नाट्यक्षेत्रासाठी नव्हतं. त्यामुळे आता त्याही
पश्‍चात्ताप व्यक्त करत आहेत.

नुकताच येथे दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करताना, मंगेशकरांनी सध्याच्या नाट्य स्थितीवर आणि नाटकांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर नाट्य क्षेत्रातून नाराजीचे सूर निघाले.

आपल्याला नाटक आणि त्यातले कलाकार अशा दोघांबदल्लही नितांत प्रेम असल्याचं लता मंगेशकार यांनी म्हटलंय. दरवर्षी उत्कृष्ट नाटकासाठी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देण्यात येतो. मात्र यंदा नाटकासाठीचा पुरस्कार देण्यात आलेला नाही. यासंदर्भात
लतादीदींना विचारलं असता आज काल मराठी नाटकं फारशी बरी नसतात, असं म्हटलं
होतं.