मुंबई: पाकिस्तानात महिला दहशतवाद्यांना घातपाती कारवायांचे प्रशिक्षण दिले जात असून महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही शहरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.

जानेवारी महिन्यात गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे या पुढील काळात महिला दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता आहे; असे पाटील यांनी सांगितले. पुणे आणि मुंबईत घातपाती कारवाया घडण्याची शक्यताही गुप्तचरांनी वर्तविली आहे.
या माहितीमुळे परदेशातून येणाऱ्या आणि विशेषत: बुरखा, स्कार्फने चेहेरा झाकणाऱ्या महिलांची चौकशी केली जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले.