पुणे: जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी हिमायत बेग याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला दि. १ रोजी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.

पुणे: जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी हिमायत बेग याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याला दि. १ रोजी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०१० मध्ये कोरेगाव पार्क येथील विदेशी पर्यटकांची वर्दळ असलेल्या जर्मन बेकरीसमोर बॉम्ब स्फोट झाले होते. या स्फोटात १७ जण ठार तर ६० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी बेग हा एकमेव आरोपी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागला. लातूर जिल्ह्यातील बेग याच्या घरी सुमारे १ हजार २०० किलो स्फोटके सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या स्फोटाचा सूत्रधार इंडियन मुजाहिदीनचा यासीन भटकळ असून त्यानेच बॉम्ब पेरल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.