‘क्युरियॉसिटी’ला सापडले ‘मार्स-३’चे अवषेश

वॉशिंग्टन: अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर सोडलेल्या ‘क्युरियॉसिटी’ला मंगळावर पहिल्यांदा दाखल होण्याचा मान मिळवणार्‍या रशियाच्या ‘मार्स-3’ या अंतराळयानाचे अवशेष सापडले आहेत. रशियाचे हे यान मंगळावर १९७१ मध्ये उतरले होते.

मार्स रेनेसान्स ऑर्बिटर’ या उपग्रहाने पाच वर्षापूर्वी पाठवलेल्या एका छायाचित्रामध्ये चार वैशिष्टयपूर्ण घटक असल्याचे रशियाच्या संशोधकांच्या लक्षात आले. या चार घटकांचे साम्य रशियाच्या मार्स-३ या अंतराळयानाच्या चार तुकडयांशी आहे. या छायाचित्रात त्या अंतराळयानाचे पॅराशूट, हिट शिल्ड, टर्मिनल रिट्रोरॉकेट व लँडर असे चार तुकडे दिसत असल्याचे त्यांना वाटत होते. त्याची पुष्टी करण्यासाठी गेल्या महिन्यात त्या भागाची पुन्हा छायाचित्रे घेण्यात आल्यावर त्यात तीच वैशिष्टये पुन्हा दिसून आली.

ज्या भागात हे यान उतरले होते त्या भागाची छायाचित्रे हायराइझ’ या उपग्रहाने नोव्हेंबर २००७ मध्ये घेतली होती. या छायाचित्रांमध्ये अंतराळयानाचे तुकडे दिसत असल्याचे वाटल्यावर त्या भागाची पुन्हा
छायाचित्रे घेण्याची विनंती करण्यात आली. हायराइझने १० मार्च २०१३ रोजी दुस-यांदा छायाचित्रे घेतल्यावर तशाच प्रकारची वैशिष्टये दुस-यांदा दिसून आली.