‘कुरुक्षेत्र’चे लवकरंच प्रदर्शन

राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर सध्याच्या दैनंदिन जीवनातील एक अत्यंत महत्वाच्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणारा ‘कुरुक्षेत्र’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट येत्या १९ एप्रिलपासून पुण्या-मुंबईसह राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘सारांश अँडस्’ ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात सत्तासंपत्ती मुळे उन्मत झालेला लोकप्रतिनिधी आणि जनहिताला प्राधान्य देणारी एक कर्तव्यकठोर महिला अधिकारी यांच्यातील आगळावेगळा संघर्ष पहावयास मिळेल असे ‘कुरुक्षेत्र’ चे निर्माते आणि दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी सांगितले.
सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष अनादीकाळापासून चालत आलेला आहे. जेव्हा या दोन्ही शक्ती तुल्यबळ असतात तेव्हा तेव्हा महाभारताप्रमाणे ‘कुरुक्षेत्र’ घडू शकते, असे सांगताना मिलिंद लेले म्हणाले की, काळ खूप बदललेला असला तरी या काळातही या ना त्या कारणांच्या निमित्ताने सुष्ट आणि
दुष्ट शक्तींचा संर्घर्ष चालूच असतो. सध्याच्या काळात सत्तासंपत्तीमुळे आलेल्या मुजोरशाहीला जेव्हा एखादा निधड्या छातीचा आधिकारी आव्हान देतो तेव्हाही ‘कुरुक्षेत्र’ सारखाच संघर्ष पहावयास मिळू शकतो.

‘कुरुक्षेत्र’ या चित्रपटाद्वारे एका धगधगत्या सामाजिक विषयाची प्रभावी मांडणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. मिलींद लेले यांनी निर्मिती केलेला ‘कुरुक्षेत्र’ हा चौथा तर स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट आहे. ‘कुरुक्षेत्र’ ची मूळ कथा मिलिंद लेले
यांचीची असून पटकथा आणि संवाद विजय कुवळेकर यांचे आहेत. तर विजय कुवळेकर यांच्याच गीतांना सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. बेला शेंडे, निहिरा जोशी आणि मिथिलेश पाटणकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. केदार गायकवाड यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. सचिन वाघ यांनी संकलन केले असून नृत्य दिग्दर्शिका आहेत फुलवा खामकर.

‘कुरुक्षेत्र’ मध्ये महेश मांजरेकर आणि शरद पोंक्षे यांच्यासारख्या दिग्गज कलाकरांबरोबरच हिंदी सिरीयला, हिंदी सिनेमा, रिअँलिटी शो मधून चमकलेली श्‍वेता साळवे हिचा मराठीत दमदार अभिनय रसिकांना प्रथमच पाहवयास मिळणार आहे. अन्य भूमिकांमध्ये जयंत सावरकर, वैभव तत्ववादी, शशांक शेंडे आदी कलाकार दिसतील. याशिवाय समीर धर्माधिकारी आणि नेहा पेंडसे हे दोघेजण पाहुणे कलाकार म्हणून चमकले असून नेहा पेंडसे यांनी सादर केलेली लावणी हे या चित्रपटाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. विविध स्पर्धामध्ये श्‍वेताला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीसाठी तसेच ‘कळी खुलवा ना’ या लावणीसाठी बेला शेंडेला सवरेत्कृष्ट पार्श्‍वगायिकेची नामांकने मिळालेली आहेत. उच्च तंत्रमूल्ये असलेला आणि अनेक अर्थांनी रसिकांची उत्कंठता वाढविणारा हा चित्रपट येत्या १९ एप्रिलपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment