‘कण्हेरीची फुले’ हा पहिलाच ब्रेथलेस अल्बम एमपीथ्रीमध्ये

पुणे:`युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’चा `कण्हेरीची फुले’ हा मराठीतला पहिलाच ब्रेथलेस अल्बम आता एमपीथ्रीच्या रुपात उपलब्ध झाला आहे. सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी एका श्वासात म्हटलेले गाणे तसेच प्रसिद्ध अभिनेता अमोल कोल्हे याने एका श्वासात केलेले अभिवाचन हे या अल्बमचे खास
आकर्षण आहे.

गाव आणि शहर यांना जोडणाऱया `मराठी ब्रेथलेस’ या गाण्याचे शब्द इतके सुंदर आहेत की प्रत्येकालाच ते पसंत पडते असा अनुभव आहे. `मराठी ब्रेथलेस’ या अल्बमची संकल्पना आणि दिग्दर्शन कवयित्री प्राजक्ता गव्हाणे यांची असून, संगीतकार तेजस चव्हाण आहेत. या अल्बमचे
निर्माते आणि गीतकार शंकर जांभळकर आहेत.

कण्हेरीची फुलेचे प्रकाशन मुळातच काही महिन्यांपूर्वी कॅसेटरुपात झाले होते आणि मराठी विश्वात प्रथमच `ब्रेथलेस’ सादर करणाऱया `कण्हेरीची फुले’ या अल्बमची `लिम्का वर्ल्ड बुक रेकॉर्ड’नेही दखल घेतली होती. या अल्मबला लाभलेला उदंड प्रतिसाद पाहून आणि रसिकांची हीच पसंती लक्षात घेऊन
`युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’च्या ऑडिओने सीडीतली `कण्हेरीची फुले’ एमपीथ्रीच्या फॉर्मेटमध्ये बाजारात आणली आहे. या नव्या स्वरुपातली`कण्हेरीची फुले’ रसिकांच्या पसंतीला पडतील यात शंका नाही.