‘अनुमती’ ३ मे रोजी होणार प्रदर्शित

पुणे: गजेंद्र अहिरे दिग्दर्शित, श्री पंत प्रॉडक्शन्स आर्ट्स निर्मित, नवलखा आर्ट्स मिडिया एंन्टरटेनमेंट आणि होली बेसिल प्रॉडक्शनसची प्रस्तुती असलेला ’अनुमती’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. विविध इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये प्रेक्षक आणि समीक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.

यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये विक्रम गोखले यांना ‘अनुमती’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर झाला. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक, संगीत अशा पाचही भूमिकेत गजेंद्र अहिरे आहेत. अजून एक खास बाब म्हणजे आक्रोश, अर्धसत्य अशा आशय संपन्न चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी
सिनेमटोग्राफर म्हणून काम पहिले आहे.

आपल्या बायकोवर नितांत प्रेम असलेला तिचा पती आणि तिला वाचवण्यासाठी त्याची चाललेला संघर्ष आणि नियतीचा खेळ यावर ’अनुमती’ आधारित आहे. विक्रम गोखले, रीमा या जोडीसोबतच नीना
कुलकर्णी, सुबोध भावे, सई ताम्हणकर, किशोर कदम, अरूण नलावडे, आनंद अभ्यंकर, रोहन मंकणी आणि नेहा पेंडसे यांच्या भूमिका आहते.

कौटुंबिक भाव-भावनांचे विविध पदर उलगडणारी अशी कथा असलेला अनुमती ३ मे रोजी प्रदर्शित होत आहे.