नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी त्याने एका सोशल नेटवर्किंगसाइटवर हरभजनसिंगशी झालेल्या आयपीएलमधील वादाच्या आठवणी भडक शब्दात मांडल्या होत्या. श्रीशांतच्या अशा कृत्यामुळे पुन्हा जुने वाद बाहेर येऊ शकतात. त्यामुळे बीसीसीआयने तेज गोलंदाज श्रीशांतला समज दिली आहे. अशास्वरूपाचा प्रकार भविष्यत पुन्हा घडल्यास कारवाई करण्याचे संकेत बीसीसीआयने श्रीशांतला दिले आहेत.
बीसीसीआयने दिली श्रीशांतला समज
काही दिवसापूर्वी आयपीएल लढतीदरम्यान मैदानातच भांडण करणा-या विराट कोहली व गौतम गंभीर यांनाही बीसीसीआयने खडसावले आहे. मैदानावर असे असभ्य वर्तन यापुढे खपवून घेतले जाणार नाही , अशा शब्दात गंभीर व कोहली यांनाही ताकीद देण्यात आली आहे.
त्यातच पाच वर्षापूर्वी हरभजनसिंगशी झालेला वाद तेज गोलंदाज श्रीशांतने एका सोशल नेटवर्किंगसाइटवर या आयपीएलमधील वादाच्या आठवणी भडक शब्दात मांडल्या होत्या.म्हणूनच बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सच्या या तेज गोलंदाजाला दम भरला आहे. अशास्वरूपाचा प्रकार भविष्यात पुन्हा घडल्यास कारवाई करण्याचे संकेत बीसीसीआयने त्याला दिले आहेत.