शाहरुख आणि आमिर झळकणार एकत्र

इंडस्ट्रीमधले दोन टॉप राइवल्स स्क्रीनवर एकत्रित येत नाहीत. दोघांना एकत्र आणणे फिल्ममेकरसाठी अवघड काम असते. मात्र येत्या काळात नतीजतन, शाहरुख खान आणि आमिर खान त्यांच्यातील गेल्या काही दिवसापासून असलेली दुश्मनी विसरून मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

यापूर्वी हे दोघे स्टार्स मल्टिप्लेक्स आणि फिल्म प्रड्यूसर्समध्ये झालेल्या कमिशनच्या वादामुळे इंडस्ट्रीमध्ये सोबत दिसत होते. आता नवीन सिनेमात दोघेजन एकत्र झळकणार असल्याने दोघेजण पहिल्यांदा स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. ‘बॉम्बे टॉकीज’ हा सिनेमा इंडियन सिनेमाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने तयार करण्यात येत आहे. या सिनेमातील एका गाण्यात अमीर- शाहरुख हे दोघे सुपरस्टार्स दिसणार आहेत.

या सिनेमात चार छोट्या सिनेमाचा सहभाग असणार आहे. करण जौहर, जोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बनर्जी सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या चारपण सिनेमासाठी एक कॉमन सॉन्ग ठेवले आहे. या सिनेमात करीना कपूर, कैटरीना कैफ, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण हे टॉपचे हीरोइन्स गोल्डन कलरच्या कॉस्ट्यूम्स मध्ये झळकणार आहेत. या गाण्यात अनिल कपूर सारख्या सीनियर ऐक्टरपासून ते वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सारख्या यंग ऐक्टर्स गाण्यात झळकणार आहेत.

Leave a Comment