कराड – पाणी मागणा-या शेतक-यांची थट्टा करून त्यांना क्लेष देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता उपरती झाली आहे. चुकीचा अजित पवारांना पश्चात्ताप झाला असून त्याचे प्रायश्चित म्हणून ते कराड येथे एका दिवसाच्या आत्मक्लेष उपोषणाला बसले आहेत.

अजित पवार म्हणाले, ‘हे उपोषण म्हणजे मी जे काही बोललो ती मोठी चूक होती याची जाणीव झाल्यानेच मी आत्मक्लेष करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने यशवंतरावांचा काळाची उजळणी करण्याचा माझा प्रयत्न असेल. यापुढच्या काळात अधिक जबाबदारीने वागण्याचा आणि सार्वजनिक जीवनात वावरताना शब्दांचा वापर व्यवस्थित करणार आहे.
उपोषणासाठी त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाची निवड केली आहे. त्यासाठी आज सकाळीच अजित पवार कराड दाखल झाले. यशवंतरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत कुठलाही लवाजमा नव्हता. अत्यंत मोजक्या लोकांसोबत ते उपोषणाला बसले आहेत.
पवारांच्या इंदापूर येथील वक्तव्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही राज्यातील नेत्यांची छी-थू झाली होती. विरोधकांसह राज्यातील जनतेने वेगवेगळ्या माध्यमातून अजित पवारांना चांगलेच झोडपून काढले. मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या अजित पवारांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे बिथरलेल्या अजित पवारांनी याप्रकरणी तत्काळ माफी मागितली. मात्र, ही माफी पुरेशी होणार नाही याचा अंदाज आल्याने आता त्यांनी ‘इमेज मेकओव्हर’चा प्रयत्न सुरू केला असून उपोषण सुरू केले आहे.