इस्लामाबाद, दि. १३ – पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना आणखी सहा दिवसांचा दिलासा मिळाला आहे. मुशर्रफ यांना देण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनाच्या मुदतीत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत वाढ केली.

पाकिस्तानच्या अध्यक्षपदावर असताना मुशर्रफ यांनी 2007 मध्ये देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी अनेक न्यायाधीशांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याबद्दल मुशर्रफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामिनाच्या मुदतीत वाढ करण्याच्या विनंतीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा देताना अटकपूर्व जामिनाच्या मुदतीत वाढ केली.
सुनावणीवेळी मुशर्रफ बुलेटप्रूफ जाकीट परिधान करून न्यायालयात हजर होते. सुरक्षेसाठी त्यांच्यासमवेत अंगरक्षकांचे मोठे कडेही होते. परदेशांत आश्रय घेतलेले मुशर्रफ सार्वत्रिक निवडणुका लढवण्यासाठी सुमारे चार वर्षांनी नुकतेच मायदेशात परतले आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी तालिबान या दहशतवादी संघटनेने दिली आहे.