सुष्मिता करणार अक्रम सोबत लग्न

बॉलीवूडमधील ब्यूटीफूल अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसपासून पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमच्या प्रेमात पडली असल्याची चर्चा होती. पण आता याबाबतीत दोघांनी पण हद ओलांडली असून काही मीडिया चैनलने दोघांनी लग्न केली असल्याची बातमी छापली आहे.

सुष्मिता खूपच बोल्ड आहे. तसे पाहिले तर ती लग्नाची बातमी लपवेल असे वाटत नाही. मात्र काही चैनलने त्यांचे लग्न झाली असल्याची बातमी दिली आहे. विश्वसुंदरी सुष्मिता सेन नेहमीच चर्चेत असते. तिच्या लग्नाची चर्चा सुद्धा नेहमीच होत असते. सुष आणि वसीम अक्रमच्या बाबतीत नेहमीच चर्चा असते. मात्र सुषने याला नेहमीच विरोध केला आहे. मात्र वसीम अक्रमने पाकमधील न्यूज चैनलला बोलताना पुन्हा हवा दिली आहे. सुष्मिता सेन खूप सुंदर दिसते आणि ती मला खुप आवडते. आगामी काळात नायिका म्हणून अभिनेत्रीची निवड करायची झाली तर मी सुष्मिता सेनची निवड करेल असे सांगून टाकले आहे.

वसीमची पहिली पत्नी हुमा खानचा दोन वर्षापूर्वी कान्सरने निधन झाले आहे. त्यावेळेसपासून वसीम एकटाच आहे. त्यामुळेच सुश्मिता आणि अक्रमच्या लग्नाची नेहमीच अफवा पसरविली जाते. वसीम सुषला पसंत करतो दोघात चांगली दोस्ती आहे पण मात्र सुष त्याच्यासोबत लग्न करणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सुष्मिताच्या सचिवने या बातमीत काही दम नसून केवळ अफवा असल्याचे सांगून टाकले आहे.

Leave a Comment