‘बदला’ मधून झळकणार बिग बी अन विद्या

‘कहानी’ हा सिनेमाची निर्मिती करणारा निर्माता सुजॉय घोष आगामी काळात ‘बदला’ हा सिनेमा तयार करीत आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री विद्या बालन लीड रोल करणार आहे. सुजॉय घोषचा कहानी’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्याशिवाय या सिनेमाला अवॉर्ड मिळाला असल्याने येणारा सिनेमा देखील असे सुपरहिट ठरेल असे वाटते.

आगमी काळात येत असलेला सुजॉयचा हा सिनेमा दुश्मनी आणी बदल्याच्या कहानीवर आधारित आहे. ‘बदला’ या सिनेमासाठी सुजॉयने बिग बी अमिताभ बच्चनला त्याने साइन केले आहे. त्यासोबतच अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिका करणार आहे. अमिताभ आणि विद्या यांनी यापूर्वी ‘पा’ हा सिनेमा एकत्रित काम केले आहे. या सिनेमात विद्याने अमिताभच्या आईचा रोल केला होता. हा सिनेमादेखील सुपरहिट ठरला होता.

‘बदला’ या सिनेमात अमिताभ शिवाय अभिनेता नसीरुदीन शाह मुख्य रोल करणार आहे. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन, नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री विद्या बालन लीड रोल करणार असल्याने या सिनेमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.