मुंबई – पोलिसांचे पितळ उघडे झाल्याने कासिम खानला पोलिसांनेच धमकी दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीपी पदावरील अधिकारी आपल्या घरी चौकशीसाठी आले आणि तपास करण्याऐवजी त्याने धमकी दिल्याची माहिती कासिमने दिली .
पोलिसांनेच दिली कासिम खानला धमकी
यावेळी बोलताना कासीम म्हणाला, ‘ बुधवारी रात्रभर मी तणावाखाली होतो. माझ्या मनात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता . पोलिसांना लाच घेण्यासाठी प्रवृत्त केले असावे , या आयुक्त डॉ. सिंग यांच्या सारवासारवीच्या विधानावरही खान यांनी नाराजी व्यक्त केली. आयुक्त भ्रष्ट पोलिसांना पाठीशी घालत आहेत. मला आता आयुक्तांचीही भीती वाटते, असे ते म्हणाले .
कासीम म्हणाला, ‘ स्टिंग ऑपरेशन करण्यात माझा कोणताही फायदा नाही . मुलाच्या मदतीने मी हे ऑपरेशन पार पाडले आणि पोलिसांचे खरे चेहरे सर्वांसमोर आणले . व्हिडिओमध्ये ३५ पोलिस असले तरी ते इतर वरिष्ठ अधिका-यांची नावे घेत आहेत , त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.’
