होंडाची डिझेल कार अमेझ भारतात दाखल

नवी दिल्ली दि.१२ – जपानी मोटर उत्पादक कंपनी होंडा मोटर्सने त्यांची पहिली डिझेल कार भारतीय बाजारात सादर केली असून तिची किमत सहा लाख ते ७ लाख ६० हजार रूपयांच्या दरम्यान आहे. अमेझ असे नामकरण करण्यात आलेली ही कार सेदान श्रेणीतील आहे. होंडाने सादर केलेली ही पहिलीच डिझेल कार असली तरी भारतीय ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन ती खास भारतीय बाजारपेठेसाठी बनविली गेली असल्याचे कंपनीने घोषित केले आहे.

होंडा कार्स इंडिया कंपनीने हेच मॉडेल पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केले असून त्यांची किमत पाच लाख ते ७ लाख ६० हजारांचा दरम्यान ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. डिझेल मॉडेल प्रति लिटर ला २६ किमीचे अॅव्हरेज देईल असा कंपनीचा दावा आहे. ही मॉडेल्स मारूतीच्या स्विफ्टशी स्पर्धा करण्यासाठी सादर केली गेली आहेत.