सिगारेटमुळे भारतीय दाम्पत्य अडचणीत

लंडन दि. १२ – पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडून आलेल्या केवळ तीन शब्दांमुळे एका कुटुंबावर विभक्त होण्याची वेळ आलीय, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हा प्रसंग ओढवलाय इंग्लंडमधल्या भारतीय दाम्पत्यावर… डॅड इज बॅड या केवळ तीन शब्दांमुळे एका कुटुंबाचे भावनिक जीवन ढवळून निघालंय. इंग्लंडमधल्या एका शाळेत पाच वर्षांच्या मुलाच्या तोंडून हे शब्द निघताच शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार करण्यात आली आणि मुलाला आईवडिलांपासून दूर करत एनजीओकडे सोपवण्यात आले.

हे सारं एवढ्यावरच थांबले नाही तर एनजीओने मुलाच्या आईपुढे अजब अट ठेवली, मुलाच्या वडिलांपासून घटस्फोट घेण्यात यावा….  झाले असे की एके दिवशी मुलाने वडिलांना सिगारेट ओढताना पाहिले आणि त्याने याबाबत आईला सांगितले. आईने ही बॅड हॅबिट असल्याचे मुलाला सांगितले आणि मुलाच्या मनात ही गोष्ट घर करून गेली. आणि तो शिक्षिकेसमोर बोलून गेला ’डॅड इज बॅड’ दुसरीकडे शाळेच्या शिक्षणाबाबत तक्रार केल्यानंच शाळेनंच हा डाव साधल्याचा आरोप मुलाच्या आजीआजोबांनी केला आहे.

मुलाच्या आजोबांच्या मते त्यांचा जावई सुसंस्कृत असून त्याच्या बाबत गेल्या १० वर्षांत कोणतीही तक्रार नाही. इंग्लंड सरकारने एनजीओ ऐवजी मुलाला आमच्याकडे सोपवावं अशी मागणी आजोबांनी केली आहे. मुलांना आई वडिलांनी चांगल्या-वाईट सवयींची माहिती करून देणं हा गुन्हा आहे का, आणि यासाठी त्या मुलाला आई वडिलांपासूनच दूर करणं हा कुठला अजब न्याय असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत…

Leave a Comment