मुलीला भेटण्यासाठी मोजले ३० लाख पाऊंड!

न्यूयॉर्क दि.१२ – मुलीच्या सातव्या वाढदिवशी तिला भेटण्यासाठी हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ याने चक्क महागडे खासगी विमान भाड्याने घेतले होते. त्यासाठी त्याने तब्बल ३० लाख पाऊंड खर्च केल्याचे वृत्त आहे.

हॉलिवूडमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचा म्हणजे सुरीचा विषय असेल तर टॉम क्रुझसाठी पैसा महत्त्वाचा नसतो. तिच्यासोबत वेळ घालविण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. हे कदाचित खर्चिक वाटेल, परंतु सुरीला भेटायचे असेल तर टॉम क्रूझ वारंवार खासगी विमान पाठवतो. त्यासाठी त्याने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. सुरीचा सातवा वाढदिवस ही याला अपवाद नाही.

सुरी ही किटे होल्म्स आणि टॉम क्रूझ यांची मुलगी आहे. दोघांचा घटस्फोट झाला असून सुरी सध्या आईकडे न्यूयॉर्कमध्ये राहते.

Leave a Comment