इस्लामाबाद दि.१२ – पाकिस्तानच्या मध्य पंजाब प्रांतात २६ वर्षीय शिक्षिकेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ही शिक्षिका शाळेत जात असताना रस्त्यातूनच तिचे अपहरण करण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला असे पोलिसांकडून समजते. ही शिक्षिका मुलतान जवळच्या खेड्यात जखमी अवस्थेत सापडली तेव्हा तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील तपासणीत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या बाबत तीन अज्ञान लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाकिस्तानात शिक्षिकेवर सामुहिक बलात्कार
या बाबत कौटुबिक कलहातून हा प्रकार घडला असावा आणि बलात्कार करणारे या शिक्षिकेच्या कुटुंबातीलच असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.