तिसर्‍या महायुद्धावरील नॉस्त्रेडेमसची भविष्यवाणी

war

पॅरिस दि.१२ – उत्तर कोरिआ आणि अमेरिकेतील एकमेकांविरोधात सुरू असणारी युद्धाची तयारी ही तिसर्‍या महायुद्धाची सुरूवात असल्याचे मानले जात आहे. जपान अमेरिकेला साथ देत आहे, तर अरब राष्ट्रे, इराण आणि चीन उत्तर कोरियाच्या बाजूने उभे आहेत. भारत आणि रशियाने आपली स्थिती स्पष्ट केलेली नाही.

१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रांसमध्ये जन्मलेल्या नास्त्रेदमसने तिसर्यार महायुद्धाबद्दल भविष्यवाणी केली होती. त्याने मांडलेल्या जगाच्या भविष्यातील बहुसंख्य घटना खर्‍या ठरल्या आहेत. ९/११ची घटनाही त्याने १६ व्या शतकात मांडली होती. नास्त्रेदमसने वर्तवलेले तिसर्‍या महायुद्धाचे भविष्य भयानक आहे. या युद्धात तीन समुद्रांनी वेढलेल्या देशाचा एक नेता असेल, ज्याचे नाव जंगली प्राण्याशी संबंधित असेल. भारत देश असा तीन समुद्रांनी वेढलेला देश आहे. आणि सध्याच्या पंतप्रधानांच्या नावात असलेले ’सिंह’ हे नास्त्रेदमसच्या भविष्याची यथार्थता पटवून देत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

यापूर्वी एका देशात जनक्रांती होऊन नवा नेता उभा राहील. (ही गोष्ट इजिप्तमध्ये घडली आहे.) वेगळ्याच देशातील नवा पोप निवडला गेला असेल. (नुकतेच निवडले गेलेले पोप हे पहिले युरोपबाहेरील देशातून निवडले गेलेले पोप आहेत.) मंगोल चर्चविरोधात लढतील. (चीन अमेरिकेशी युद्धाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.) नवा धर्म (इस्लाम) चर्च विरोधात रक्तपात करत इटलीपर्यंत पोहोचेल आणि तिसरं महायुद्ध सुरू होईल. असे नास्त्रेदमसने आपल्या ग्रंथात लिहिलेले आहे.

Leave a Comment