चिंता सर्वसामान्यांची आणि ब्रिटनच्या राणीचीही !

लंडन दि. १२ – महागाईने सर्वसामान्य कसे जगायचे या चिंतेने भरडून निघत आहेत. सामान्य आपला दिवस कसा घालवणार… थोड्याशा पैशात काय विकत घेणार.. या विवंचनेत आहेत. ब्रिटनच्या राणीलाही चिंतेने ग्रासले आहे. पण राणीची चिता थोडी वेगळीच आहे. सध्या वाढलेला पगार खर्च कसा करायचा या विचाराने राणी हैराण झाली आहे.

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वार्षिक पगारात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे मागच्या वर्षी मिळत असलेल्या वेतनापेक्षा तब्बल पाच मिलियन पौंड (जवळजवळ ४१ करोड रुपये) महाराणीला अधिक मिळणार आहेत.८० वर्षीय महाराणीला गेल्या वर्षी ३१ दशलक्ष पौंड वेतन म्हणून देण्यात आले होते. त्यामध्ये वाढ करून २०१३-१४ या वर्षांसाठी राणीला ३६.१  दशलक्ष पौंड वेतन मिळणार आहे.

पगार वाढला असला तरी ही रक्कम महाराणी कसा खर्च करणार, हे कोडं मात्र अद्यापही कायम आहे. गेल्या वर्षी महाराणीच्या सेवकांना वेतन म्हणून दहा मिलियन पौंड ( जवळजवळ ८२ करोड रुपये) देण्यात आले होते. क्राऊन एस्टेटच्या माहितीनुसार संपूर्ण देशातील ब्रिटिश संपत्ती जवळजवळ आठ बिलियन पौंड इतकी आहे.

Leave a Comment