
राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत पुणे वॉरियर्स संघाने आयपीएलच्या सहाव्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत पुणे वॉरियर्स संघाने आयपीएलच्या सहाव्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
पुणे- राजस्थान रॉयल्सवर सात गडी राखून विजय मिळवत पुणे वॉरियर्स संघाने आयपीएलच्या सहाव्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. पुण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. कारण आयपीएलमधील सलग 11 पराभवानंतर पुणे संघाचा हा पहिला विजय आहे.
राजस्थानचा कर्णधार द्रविडने पुण्याविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीकरण्याची निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजीकरत पाच बाद 145 धावा केल्या. राजस्थानकडून कर्णधार राहुल द्रविडने 54 धावा केल्या. राजस्थानकडून द्रविड वगळता अन्य कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. पुण्याकडून राहुल शर्मा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
विजयासाठी 146 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पुण्याच्या संघाने राजस्थानवर विजय सहज विजय मिळवला. युवराज सिंगने षटकार खेचत पुण्याला विजय मिळवून दिला.