मुंबई -उजनी धरणात येत्या २४ तासांत पाणी सोडावे , असा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आदेश मंगळवारी हायकोर्टाने दिला . अजितदादांनी त्यांना न्याय दिला नसला तरी , हायकोर्टाने मात्र मोठा दिलासा दिला आहे. सध्या भामा आसखेड आणि आंध्र धरणात पाणीसाठा समाधानकारक आहे . भामा आसखेडमधून साधारणतः अडीच अब्ज घनफूट ( टीएमसी ) आणि आंध्रमधून अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे . पाणी सोडण्याचा निर्णय आज , बुधवारी होणार आहे.
उजनीत २४ तासांत पाणी सोडा; आज निर्णय
सोलापूरमधील शेतक-यांना पाणी मिळावे , यासाठी उपोषणाला बसलेले सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी उजनीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती . त्यांच्या या उपोषणाची अजितदादांनी अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली होती .
उजनी धरणातील पाण्यासाठी सोलापूरमधील नागरिकांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती . उजनी धरणाच्या वरच्या बाजूस २२ धरणे आहेत . या धरणांमध्ये पाणी असल्यामुळे उजनीमध्ये पाणी येत नाही . आसपासच्या धरणातील पाणी उजनी धरणामध्ये सोडावे आणि या पाण्याचे समान वाटप करावे , अशी नागरिकांची मागणी होती . हाच मुद्दा अॅड . महादेव चौधरी यांनी मुख्य न्या . मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर मांडला .
