भारत-पाक ऑनलाईन तिकीटे अर्ध्यातासात संपली

दुबई: भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये जगाच्या पाठिवर कुठेही क्रिकेटचा सामना असो; तुम्हाला प्रेक्षकांचा रिकामा स्टॅण्ड शोधूनही सापडणार नाही. या दोन देशांमध्ये चॅम्पियन्स
ट्रॉफीमध्ये होणा-या सामन्याच्या तिकीट विक्रीतही असाच अनुभव आला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तिकीटे संपली.

भारत-पाकिस्तानमध्ये १५ जूनला एजबेस्टॉन येथे सामना होणार आहे. भारत-पाक सामन्याच्या ऑनलाईन तिकीट विक्रीला मिळालेला प्रतिसाद पाहून स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्थीही आश्चर्यचकीत झाले आहेत.

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी काही ठराविक तिकीटांची ऑनलाईन विक्री करण्यात आली. अंतिम सामन्याचीही सर्व तिकीटे विकली गेली आहेत. गोल्ड, सिल्व्हर आणि फॅमिली अशा तीन श्रेणींमध्ये तिकीट विक्री झाली. कार्डीफ, एजबेस्टॉन आणि ओव्हल अशा तिन्ही ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.

Leave a Comment