
नवी दिल्ली: राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे मधाचे पोळे असून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यातील ‘राणी माशी’ आहेत. त्यांच्या पश्चात इतर माश्या प्रभवहीन होऊन हे ‘पोळे’ कोसळून जाईल; असे भाकीत वर्तविणारी केबल ‘विकिलिक्स’ने प्रसिद्ध केली आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे मधाचे पोळे असून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या त्यातील ‘राणी माशी’ आहेत. त्यांच्या पश्चात इतर माश्या प्रभवहीन होऊन हे ‘पोळे’ कोसळून जाईल; असे भाकीत वर्तविणारी केबल ‘विकिलिक्स’ने प्रसिद्ध केली आहे.
नुकतीच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताला मधाच्या पोळ्याची उपमा दिली होती. चीन हा ड्रेगन आहे; तर भारत हा हत्ती आहे; असे जगात बोलले जाते; मात्र प्रत्यक्षात भारत हे एक मधाचे पोळे आहे; असे मत राहुल यांनी व्यक्त केले आहे. अमेरिकन दूतावासाने आपल्या मुख्यालयाला सन १९७३ मध्ये रवाना केलेल्या एका केबलमध्ये काँग्रेस पक्षाला मधाचे पोळे म्हटल्याचा ‘विकीलिक्स’चा दावा आहे.
ही केबल विकिलिक्सने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. इंदिरा गांधींच्या पश्चात या पोळ्यातील इतर लहान माश्या इतरत्र विखुरल्या जातील; प्रभावहीन होतील आणि हे पोळे नष्ट होईल; असे भाकित या संदेशात वर्तविण्यात आले आहे. यानंतर दोन वर्षातच इंदिरा गांधी यांनी देशातील लोकशाहीचा गळा घोटणारी आणीबाणी लागू केली आणि परिणामस्वरूप काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले.
आणीबाणी दरम्यान इंदिरा गांधी यांच्यावर नजर ठेवली जात होती आणि यादरम्यान एक गुप्तहेर
गांधी यांच्या घरातच वास्तव्य करत होता, असा दावाही विकिलिक्सने केला आहे. मात्र तो गुप्तहेर कोण होता, याची माहिती या खुलाशामध्ये देण्यात आलेली नाही. तसेच गुप्तहेर भारतीय होता की परदेशी याबाबतही विकिलिक्सने स्पष्ट सांगितलेले नाही. अमेरिकेच्या केबलच्या हवाल्याने विकिलिक्सने दावा केला आहे की; इंदिरा गांधी सन १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या घोषणा करू शकतात, अशी सूचना १९७६ मध्ये मध्य अमेरिकेच्या सरकारला मिळाली होती.
आणीबाणी लागू करण्यामागे इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी आणि सचिव आर. के. धवन यांची प्रमुख भूमिका होती, असा संदेश अमेरिकेच्या दुतावासाने आपल्या सरकारला दिला होता. २६ जून १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर दुसर्याच दिवशी हा संदेश देण्यात आला होता. आणीबाणीमागील या दोघांचा मुख्य उद्देश, इंदिरा गांधी यांना सत्तेत कायम ठेवणे हा होता, असेही या संदेशात म्हटले होते; असा विकिलिक्सचा दावा आहे.
या आधी विकिलिक्सने प्रसिद्ध केलेल्या केबलमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लढाऊ विमान खरेदीच्या वाटाघाटीत ‘साब स्कॅनिया’ या स्वीडीश कंपनीसाठी भारताकडे मध्यस्ती केल्याचा आरोप केला आहे.