मुंबई: उदयनराजे भोसलेंच्या सरंजामशाहीच्या विरोधात आमदार विवेक पंडीत यांनी उदयनराजेंचा प्रतिकात्मक राज्यभिषेक सोहळा आयोजित केला आहे.

मुंबई: उदयनराजे भोसलेंच्या सरंजामशाहीच्या विरोधात आमदार विवेक पंडीत यांनी उदयनराजेंचा प्रतिकात्मक राज्यभिषेक सोहळा आयोजित केला आहे.
देशात लोकशाही असताना देखील सातारा, रायगड आणि सोलापूरात उदयनराजेंची सरंजामशाही सुरूच आहे, आणि राज्य सरकारही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्रमजीवी रयत संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला आहे. याचा निषेध म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात हा प्रतिकात्मक राज्यभिषेक बुधवारी पार पडणार आहे. या राज्यभिषेक सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकाही श्रमजीवी रयत
संघटनेने छापल्या आहेत.
राज्यभिषेकाच्या या सोहळ्यात महाराष्ट्राचा सात-बारा उतारा उदयनराजेंच्या नावावर करण्यात येणार असून त्यांना महाराष्ट्राचा राजा हा किताबही देण्यात येणार आहे.