षटकांच्या धिम्या गतीमुळे राहुल द्रविडला दंड

जयपूर: कोलकाता नाईट रायडर्स विरुध्दच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडला वीसहजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सोमवारी रात्री जयपूरमध्ये झालेल्या केकेआर विरुध्दच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने षटक गतीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली; असे आयपीएल प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

आयपीएल अचारसंहितेच्या षटकगतीच्या नियमांतर्गत या मोसमातील ही पहिली दंडात्मक कारवाई आहे. राजस्थान रॉयल्सने केकेआर विरुध्दचा हा सामना १९ धावांनी जिंकला. सध्या गुणतालिकेत सलग दोन विजयांसह राजस्थान संघ अव्वलस्थानी आहे.

Leave a Comment