लक्ष्मण मानेंना दि. १२ पर्यंत पोलीस कोठडी

सातारा: लैंगिक अत्याचार प्रकरणावरून अटकेत असलेले ‘उपरा’कार माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांना सत्र न्यायालयाने दि. १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या माने यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

माने यांच्या विरोधात त्यांच्याच संस्थेतील सात महिलांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे. त्यानंतर तब्बल १५ दिवस ते बेपत्ता होते. सोमवारी दुपारी माने सातारा पोलिसांच्या स्वाधीन झले. त्यांना अटक करताच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

त्यांचा रक्तदाब सामान्य झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी माने यांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. १२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Leave a Comment