जगन मोहनच्या कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ

हैदराबाद: सीबीआयच्या प्रमुख विशेष कोर्टाने अधिक संपत्ति जमविल्याच्या कारणासाठी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एसआर रेड्डी यांचे चिरंजीव व वायएसआर कांग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्या कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायाधीश यू दुर्गा प्रसाद रावने चंचलगुड्डा जेलमध्ये वीडियो कांफ्रेंसिंगच्या माध्यमातून सुनावनी केली.

यावेळी कोर्टाने जगनशी संबधित प्रकरणात राज्याचे माजी मंत्री एम. वेंकटा रमन राव यांच्या कोठडीत १५ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी सीबीआयने याप्रकरणी आणखीन पाचजनाच्या विरोधात आरोप पत्र दाखल करण्याची मागणी केली आहे.

उत्पनापेक्षा अधिक प्रमाणात संपती आढळून आल्याने गेल्या सहा महिन्यापासून वायएसआर काग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांची रवानगी चंचलगुड्डा जेलमध्ये करण्यात आली आहे. ते सहा महिन्यापासून जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.