अभिनेत्री हुमा कुरैशी गेल्या काही दिवसापासून भलत्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळेच तिने आगामी काळात घरा- घरात एंट्री करण्याचे ठरविले आहे. अभिनेत्री हुमा कुरैशी लवकरच ‘एक थी नायिका’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर एंट्री करणार असल्याने सर्वचजन उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
‘गैंग्स ऑफ वासेपुर’ या सिनेमातून बॉलिवुडमध्ये धमाल करणारी अभिनेत्री हुमा कुरैशी आता मोठ्या पडद्यासोबतच टीवीवर धमाल माजविणार आहे. विशेष म्हणजे हा टीवी शो ‘एक थी डायन’ या सिनेमाच्या प्रमोशनचा स्ट्रेटजीकल हिस्सा होता. यामध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी सोबत आमना शरीफ, भानु उदय आणि कलाकार सहभागी होणार आहेत.
ही स्टोरी एक मैरिड कपलची आहे. ज्यामध्ये रजिया आणि भानु उदयने मोहसिनचा रोल केला आहे. हुमाने या सिनेमात दोस्ताचा रोल केला आहे. ही आठ भागाची एक प्रमोशनल सीरिज आहे. ‘एक थी डायन’ मध्ये इमरान हाशमी, कल्कि कोचलिन, कोंकणा सेन शर्मा आणि हुमा कुरैशी हे कलाकार झळकणार आहेत.