मार्गारेट थॅचर यांचे निधन

लंडन: ब्रिटनच्या ‘पोलादी महिला; माजी पंतप्रधान मार्गारेट थेचर यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. काही वर्षापासून त्या डिमेन्शिया या विकाराने त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाबद्दल ब्रिटनच्या राज घराण्याने दु:ख व्यक्त केले आहे.

ब्रिटनच्या राजकारणाला दिशा देणारी पिढी घडविणाऱ्या थेचर यांनी सन १९७९ ते १९९० या कळत इंग्लंडचे नेतृत्व केले. ब्रिटनला आर्थिक सुधारणांचे पर्व थेचर यांच्या द्रष्टेपणामुळे पहायला मिळाले. अमेरिका आणि रशिया या महासत्तांमधील शीत युद्ध संपुष्टात आणण्यात थेचर यांचा महत्वाचा वाटा आहे.

Leave a Comment