आता पॅनकार्डसाठी आधार कार्ड ग्राह्य

pan-aadharcardनवी दिल्ली, दि.  – प्राप्तीकर विभागाकडून वितरीत केले जाणारे पॅनकार्ड मिळवण्यासाठी आता आधारकार्ड हे अधिकृत ओळखपत्र म्हणून वापरता येणार आहे. आधार कार्डावर असलेल्या माहितीचा उपयोग पॅनकार्ड मिळवण्यासाठी करण्यात यावा यासाठी अर्थमंत्रालयाला युआयडीने एक अर्ज दाखल केला आहे. त्यावर नियमावली तयार करण्यात येत असून लवकरच पॅनकार्ड मिळवण्यासाठी आधारकार्ड हे अधिकृतपणे वापरता येणार आहे.

आत्तापर्यंत अधिकृत ओळखपत्र म्हणून मतदानाचे ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅन कार्डाचा वापर केला जात होता.त्यात आता आधारकार्डाचाही समावेश करण्यात आला आहे.

या नव्या घोषणेमुळे बनावट पॅनकार्डला आळा बसणार आहे. पॅनकार्डासाठी आधार कार्डाचा वापर सुरु झाल्यास आयकर खात्याला बनावट पॅनकार्ड शोधून काढण्यास मदत होणार आहे. कारण यातील बायोमॅट्रीक पद्धतीमुळे चोर पकडण्यास मदत होणार आहे.
अर्थमंत्रालयाने गेल्या वर्षी 49 ए हा नवीन पॅनकार्ड फॉर्म जारी केला आहे. या फॉर्ममध्ये अर्जदाराला आधारकार्डाचा नंबर असणे सक्तीचे केले आहे.

Leave a Comment