नवी दिल्ली, दि. ८ – समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा काँगेसचे नेता कपिल सिब्बलांना टार्गेट केले आहे. समाजवादी पक्षाने यावेळेस सिब्बल यांची लायकी काढली आहे. सिब्बलांविरोधात समाजवादी पक्षाचे महासचिव राम आसरे कुशवाहा हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीकडे तक्रार करणार आहे.
जर हिम्मत असेल तर यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे खुले आव्हाने सिब्बलांनी मुलायम सिंग यादव यांनी दिले होते. त्यावर बोलताना कुशवाहा यांनी सांगितले की, समाजवादी पक्षाने केंद्रीय मंत्री प्रकाश जयसवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. श्रीप्रकाश जयसवाल यांनी पक्षातील एकात्मतेबाबत ज्ञान नसल्याचा टोला सपा नेता शिवपाल यादव यांनी लगावला होता. तर काँग्रेस सीबीआयचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप मुलायम सिंग यादव यांनी केला होता.