पुणे: सध्या आयपीएलचा रोमांच दिवसेंदिवस शिगेला पोहचत आहे. त्याच प्रमाणे सामन्यागणिक जखमी खेळाडूचे प्रमाण देखील वाढत आहे. रविवारी पंजाब विरुद्ध पुणे वरियर्स सामन्यात जखमी झाल्याने युवराजला बाहेर बसावे लागले तर दुसरीकडे सोमवारच्या कोलकत्ता विरूद्च्या सामन्यात राहुल द्रविड व शेन वाटसन खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात रंगत येणार आहे.
पुणे वारियर्सचा फलंदाज युवराज सिंह पाठीत दुखत असल्याच्या कारणावरून किंग्स इलेवन पंजाब विरुद्च्या सामन्यात खेळू शकला नाही. युवराजच्या जागा या सामन्यात टी. सुमन याने घेतली. युवराज सनराइजर्स हैदराबाद विरुद्च्या सामन्यात चांगली फलंदाजी करू शकला नव्हता. त्याने लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजी केली होती.
दुसरीकडे आज गुलाबीनगरमध्ये आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गेल्या वेळेसचा चैम्पियन कोलकाता नाइटराइडर्स यांच्यात लढत होणार आहे. आस्ट्रेलियाचा खेळाडू शेन वाटसन जयपुरला पोहचला आहे. दिल्ली डेयरडेविल्स विरुद्च्या सामन्यात फील्डिंग करताना जखम झाली होती. तर कप्तान राहुल द्रविड पण जखमी झाला होता. मात्र दोघेपण या सामन्यापूर्वी फिट झाले आहेत. त्यांच्या फॉर्ममुळे सर्वजन रोमांचित झाले आहेत.