चंद्रपूर: उन्हाच्या वाढत्या तडाख्याबरोबर राज्यातील जनतेला लोडशेडिंगला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनचा ५०० मेगावॅट क्षमतेचा विद्युत संच, सोमवारी रात्री अचानक बंद पडला आहे.

ट्यूब लिकेजमुळे ५ नंबरचा संच बंद पडल्याचं महाजनकोच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
२३४० मेगावॅट क्षमतेच्या या विद्युत संचातून १२०० ते १३०० मेगावॅट वीजच मिळत आहे. हा विद्युत संच दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु असून, तो लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.