मनोज जोशी तृतीय पंथीयाच्या भूमिकेत

पुणे: मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांच्या ‘ऋण’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले आहे. विशाल गायकवाड या चित्रपटा द्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट पुण्यात घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे.

गावातील एक तरुण शहरात शिकण्यासाठी येतो आणि त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात त्याला तृतीय पंथीयांची कशी मदत होते आणि तो तरुण त्यांच्या सहकार्याचे ऋण कसे फेडतो; अशा कथाबिजावर हा चित्रपट आधारित आहे.

मनोज जोशी आणि नारायणी शास्त्री या चित्रपटात तृतीय पंथीयांच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनंत जोग, विनय आपटे,विजय पाटकर, उषा नाईक, विवेक लागू, जयराज नायर यांच्याही ‘ऋण’ मध्ये महत्वाच्या भूमिका आहेत.

नेहमी पेक्षा वेगळा असलेला हा चित्रपट लोकांना नक्की आवडेल असे मत निर्माते मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांनी या वेळी व्यक्त केले.

Leave a Comment