दाऊद इब्राहिमचा अंडरवर्ल्डला बँक ऑफ बरोडामधून पैसा?

कराची दि. ६- भारताला अनेक दहशतवादी हल्ल्यासाठी हवा असलेला कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम दहशतवादी गटांना पैसा पुरवित असून हा पैसा बहामामधील नासाऊ शहरात असलेल्या बँक ऑफ बरोडाच्या शाखेतूनच पुरविला जात असल्याचे सीएनएन आयबीएनने केलेल्या शोध मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. या शाखेतून प्रचंड मोठ्या म्हणजे अब्जावधी डॉलर्सच्या रकमा ट्रान्स्फर केल्या जात असून त्या दुबईतील कांही वित्तिय संस्थांकडून पाठविल्या जात आहेत आणि हा सर्व व्यवहार दाऊदच्या नेतृत्त्वाखाली केला जात आहे असे समजते.

इतकेच नव्हे तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अनेक दहशतवादी गटांचे व्यवहार दाऊदच सांभाळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या शोध मोहिमेत दुबईतील किमान तीन करन्सी एक्स्चेंज सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांची नांवे अल झरौनी, दुबई करन्सी एक्स्चेंज आणि अल दिर्हा्म अशी आहेत. हा सारा पैसा संघटित गुन्हेगारांसाठीच पाठविला जात आहे असाही दावा करण्यात येत आहे

भारतीय वरीष्ठ तपास अधिकार्यांानी यापूर्वीच अल दिर्हााम एक्स्चेंच दाऊदच ऑपरेट करत असल्याचे पुरावेही दिले होते. हा पैसा अमली पदार्थ तस्करी तसेच दक्षिण आशियातील जिहादी संघटनांना पुरविला जात असल्याचेही संकेत मिळाले होते. हा व्यवहार वर्षाला तब्बल साडेतीन अब्ज डॉलर्स इतका असून अनेक कंपन्यांच्या नावाखाली तो सुरू आहे असेही समजते.

या प्रकारे पुरविला गेलेला पैसा परत पाकिस्तानात पाठविला जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ मिळत आहे असाही आरोप शोध मोहिमेतील सहभागींनी केला असून २०१२ मध्ये या प्रकारे १० अब्ज डॉलर्स पाकिस्तानात परत आले आहेत आणि त्यामुळेच कराची स्टॉक एक्स्चेजही ४९ टक्क्यांनी वाढला असल्याचेही या सहभागींचे म्हणणे आहे.

Leave a Comment