व्हिडिओ गेमच्या नादापायी सहा वर्ष कॅफेमध्येच

game

बिजींग दि.६ – व्हिडिओ गेमचे दिवाने जगभरात सगळीकडे  दिसतील परंतु हा दिवाना खास चीजच म्हणायला हवा. चीनमधल्या या  युवकाने स्वतःला सहा वर्ष सायबर कॅफेमध्ये बंदिस्त करून घेतल आहे. कारण त्याला आपल्य  व्हिडिओ गेम खेळण्यात अजिबात खंड पडू नये असे वाटते. लि मेग असे या २३ वर्षीय तरूणाचे नाव आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, लि मेग खूप कमी वेळा आपल्या खुर्चीतून उठतो, तो फक्त जेवण करण्यासाठी अथवा कधी तरी अंघोळ करण्यासाठी स्क्रीनवरून आपली नजर हटवितो.

लि मेग इंटनेटवर वस्तू विकूनच आपला उदरनिर्वाह करतो. त्यातून त्याला दरमहा साधरण २१५ डॉलर्सची कमाई होते. त्यामधले ५३ डॉलर्स तो सायबरच्या मालकाला देतो असे समजते.

Leave a Comment