महाप्रचंड अंडे

egg

लंडन दि. ६ – कोंबडीच्या अंड्यापेक्षा १०० पट मोठ्या अंड्याचा लिलाव लंडनच्या सूदबे कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे. हे अंडे १७ व्या शतकातील एलिफंट बर्ड या पक्षाचे आहे. सन १६४० ते ५० च्या दरम्यान मादागास्कार भागात सापडणारे हे पक्षी सुमारे दहाफूट उंच आणि ४०० किलो वजनाचे होते. येत्या २४ एप्रिल रोजी त्याचा लिलाव होणार असून या अंड्याला सुमारे साडेसोळा लाख ते २४ लाख ७० हजार रुपयांपर्यंत बोली लागू शकते, असा लिलाव कर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment