प्राध्यापक बहिष्कारावर अजूनही ठाम

मुंबई: प्राध्यापकांच्या बहिष्काराचा आज ६० वा दिवस उजाडलाय. अजूनही राज्य सरकारकडून लेखी आश्वासन मिळालेलं नाही अशी एमफुक्टोची तक्रार आहे. प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी १५०० कोटी देण्याचं सरकारने आश्वासन देऊन सुध्दा एमफुक्टोची आठमुठी भूमिका कायम आहे.

अधिवेशनात याबाबत उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केली होती. पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय किंवा चर्चा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असं एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी स्पष्ट केलंय.

मार्च महिन्याचं संपकरी प्राध्यापकांचं वेतन रोखण्याचा आदेश दिल्याचं सरकारचं म्हणणं आहे, मात्र
अशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याची एमफुक्टोचं म्हणणं आहे. एमफुक्टोच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतं आहे.

Leave a Comment