रांची: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी झारखंडमधील नऊ आमदारांसह तेरा जणांच्या निवासस्थानांवर छापे टाकले. राज्यसभेच्या २०१० मधील निवडणुकीवेळी झालेल्या पैशांच्या बदल्यात मत (कॅश फॉर व्होट) घोटाळ्याच्या संबंधात ही कारवाई करण्यात आली.

झारखंड आणि या राज्याबाहेरील ३० ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. झारखंड मुक्ती मोर्चाचा (झामुमो) एक, काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) पाच आमदार या कारवाईचे लक्ष्य ठरले. हा घोटाळा प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणला होता. राज्यसभा निवडणुकीत एका विशिष्ट उमेदवाराला पैशांच्या बदल्यात मत देण्याची तयारी सहा आमदारांनी दर्शवल्याचे एका ध्वनीचित्रफितीमुळे पुढे
आले. त्यानंतर या घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
याप्रकरणी सायमन मरांडी आणि दिवंगत टेकलाल माहतो (झामुमो), राजीव रंजन, योगेंद्र साओ आणि सावना लाकडा (काँग्रेस) तसेच यादव अकेला (भाजप) या आमदारांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.