राष्ट्रपतींकडून ७ जणांच्या फाशीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सात आरोपींना फाशी तर दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबसह संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुला फासावर लटकावण्यात आल्यापनंतर राष्ट्रप्ती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्यकडचे सर्व दयेचे अर्ज आज निकाली काढले आहेत. त्यानुसार आता दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे हरियाणातील एका प्रकरणात दोषी आढळलेल्या धरमपाल याला लवकरच फाशी दिली जाण्याची शक्यता आहे.

धरमपालने १९९१ मध्ये सोनीपत येथे एका तरुणीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात तरुणीने कोर्टात साक्ष दिल्यामुळे १९९३ मध्ये धरमपालला शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान पॅरोलवर सुटला असताना धरमपालने त्याचा भाऊ निरमल याच्या मदतीने पीडीत तरुणीचे आई-वडील, बहीण आणि दोन भाऊ अशा पाच जणांची हत्त्या केली होती. या हत्येप्रकरणी कोर्टाने धरमपाल आणि निरमलला फाशीची शिक्षा दिली होती. सन १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने धरमपालची शिक्षा
कायम ठेवली आणि निरमलच्या फाशीचे जन्मठेपेत रुपांतर केले होते. निरमल
२००१ मध्ये पॅरोलवर सुटताच फरार झाला होता. त्याला दहा वर्षानंतर पुन्हा अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले होते.

अन्य सात प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्या नऊ जणांच्या दयेच्या अर्जांवर राष्ट्रपतींनी आपला निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवला आहे. राष्ट्रपतींनी सात पैकी पाच प्रकरणांतील दोषींचे दयेचे अर्ज फेटाळले आणि दोन प्रकरणांमध्ये दोषींची फाशीची शिक्षा माफ करुन त्यांना जन्मठेपेची
शिक्षा दिली आहे. ही जन्मठेप १४ किंवा २० वर्षांची नाही तर मरेपर्यंत भोगावी लागेल, असेही राष्ट्रपतींनी सांगितले आहे. राष्ट्रपतींच्या या निर्णयांमुळे आता त्यांच्याकडे दयेसाठी आलेला एकही अर्ज प्रलंबित राहिलेला नाही.

Leave a Comment