तीन भारतीयांना अमेरिकेत पुरस्कार

वॉशिंग्टन: स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला अत्याचारविरोधी प्रभावी काम केल्याबद्दल तीन भारतीय भावांना ‘विश्‍वबंधुत्व पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांच्या हस्ते रव्फी, ऋषी आणि निशिकांत या तिघांना हे पुरस्कार देण्यात आले. सन १९९७ मध्ये हिलरी क्लिंटन यांच्या ‘वायटल व्हॉइस’ यासंस्थेच्या माध्यमातून हे पुरस्कार देण्यात येतात.

यावेळीतालिबान्यांच्याविरोधात आवाज उठवणार्‍या मलाला युसुफजाई या पाकिस्तानी युवतीला ‘ग्लोबल ट्रेलब्लेझर अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

आपल्या शक्तिवाहिनी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, किमान एक दशकापेक्षा अधिक काळ भारतीय महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात कांत बंधू हे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. महिलांच्या सुरक्षेसह बालकांच्या शिक्षणाच्या हक्कासाठीही ही संस्था कार्यरत आहे.

Leave a Comment