गडचिरोलीमध्ये चकमकीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोली: महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांनी चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश मिळवले आहे. या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

भामरागड तालुक्यातील भटपार या गावाजवळच्या जंगलात रात्रीच्या सुमारास पोलीस गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यात चार नक्षलवादी ठार झाले. चार नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चकमकीचे वृत्त
मिळाल्यानंतर या परिसरातील पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे.

मृतांच्या आकड्याबाबत मात्र संभ्रम कायम असून, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांचे साथीदार पळवून नेतात. त्यामुळे मृतांचा नक्की आकडा सांगता येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.