अंतराळ संशोधनात मोठा वाव- सुनीता विल्यम्स

मुंबई,4 एप्रिल – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कमांडर सुनीता विल्यम्स यांनी नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे शालेय विद्यार्थ्यांशी आज उत्साहाने संवाद साधला. त्यांनी त्यांचे अंतराळातले अनुभव विद्यार्थ्यांना कथित केले. विद्यार्थीसुध्दा उत्सुकतेने सभागृहात सुनीता विल्यम्सला जवळून बघण्यासाठी पुढची जागा मिळावी यासाठी प्रयत्नात होते.

यावेळी सुनीता विल्यम्स यांनी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनात भरपूर वाव असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली रुची या क्षेत्रात वाढवावी, असे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, मी भारताच्या अंतराळ कार्यक‘मातील सहभागासंदर्भात अतिव्यापकतेने लक्ष घालत आहे. नासाच्या अंतराळवीर ज्यांनी ५० तास ४० मिनिटे सर्वाधिक लांबीचा अंतराळ प्रवास करून उच्चांक मोडीत काढला. त्यांनी सांगितले की, तुमच्यातील संभाव्य सृजनशीलतेला या क्षेत्रामध्ये वाव आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला येथे मिळू शकेल.

भारताच्या १ एप्रिलपासूनच्या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय विज्ञान केंद्र नवी दिल्ली, विज्ञान शहर कोलकाता यांना भेट दिली असून यानंतर त्या पुढे त्यांच्या वडिलांच्या कुटूंबियांना भेटायला गुजरातमधील मेहेसाना जिल्हयातील त्यांच्या मूळ गावात एक छोटी भेट देणार आहेत.

Leave a Comment