कैट आउट संगीता इन

बॉलीवुडचा ‘दबंग’ सलमान खान गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडला आहे. एकीकडे सलमान आजाराने त्रस्त असतानाच दूसरीकडे चिंकारा शिकार केस, हिट एंड रन केस मधून त्याची सुटका अजून झाली नाही. त्यातच सलमानच्या घरी त्याची जुनी गर्लफ्रेंड संगीता बिजलानीची एंट्री झाली आहे.

सध्या सलमानचा लग्नाचा विषय मात्र दररोज चर्चिला जातो. काही दिवसापूर्वी कटरीना सोबत सलमानचे अफयेर सुरु असल्याची चर्चा होती. कैटने मात्र सलमानला हुलकावणी दिली असून ती अभिनेता रणबीर कपूर सोबत दिसत आहे. त्यामुळे सलमान तिच्यावर खुपच नाराज झाला आहे. सलमानला कटरीनाने केलेली बेवफाई पसंत पडलेली नाही. त्यातच आता सलमानची जुनी गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने सलमानच्या घरी एंट्री केली आहे. त्यासोबतच ती आता सलमानच्या ह्र्दयात जागा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न करित आहे.

२०१० पर्यंत संगीता तिचा पति माजी क्रिकेटपटू अजहरूद्दीन सोबत राहत होती. मात्र अजहरूद्दीनचे नवा बैडमिंटन प्लेयर ज्वाला गुट्टा सोबत जोडले गेल्याने संगीता सध्या तिच्या आईच्या घरी राहत आहे. त्यामुळे संगीता आता दररोज सलमानच्या घरी जात आहे. तिची सलमानची बहिन अलवीरासोबत चांगली दोस्ती आहे.त्यामुळे आता येत्या काळात संगीता पुन्हा सलमानच्या ह्र्दयात जागा निर्माण करण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहणे ओत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment