9 निष्पापांचा बळी घेणारा संतोष माने दोषी

पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) -पुण्यात बेदरकारपणे चालवून 9 जणांना चिरडून मारणार्‍या एसटीड्रायव्हर संतोष माने याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.के.शेवाळे यांनी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर जखमी करणे, चोरी, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अशा आरोपाखाली न्यायालयाने संतोष माने याला दोषी धरले आहे. सोमवारी संतोष माने याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

संतोष माने याने 25 जानेवारी 2012 रोजी स्वारगेट एस.टी.स्थानकतून एसटी पळवून शंकरशेट रस्ता, पुलगेट, कॅम्प, मित्रमंडळ चौक, सारसबाग आणि तेथून पर्वती पायथ्यापर्यंत सुसाट वेगाने पळवत पुण्यात अक्षरश: मृत्यूचे तांडव घातले आहे. यात 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 25 जण जखमी झाले होते. 27 गाड्यांना त्याने ठोकले होते. या खटल्यात 39 साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली. यानंतर संतोष माने याचा जबाब झाला. त्यानंतर सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा अ‍ॅड उज्ज्वला पवार आणि बचाव पक्षाचे अ‍ॅड. धनंजय माने यांचा युक्तीवाद झाला.

संतोष माने मानसिक रुग्ण आहे. त्याने हे कृत्य वेडाच्या भरात केले आहे. त्यामुळे कलम 84 नुसार मानेला मुक्त करावे, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता. मात्र, संतोष माने घटनेच्या दोन दिवस आधी 23 आणि 24 जानेवारी रोजी गाणगापूर येथे एसटी घेऊन गेला. अन सुखरूप परत आला होता. त्याच्याविरोधात एकाही प्रवाशाने कसलीही तक्रार केली नव्हती. 25 जानेवारी रोजी नोकरीच्या वेळेच्या वाद झाल्यानंतर एस.टी.गाडी पळवताना संतोष माने शुध्दीत होता. तसेच त्याला ज्यावेळी पोलिसांनी पकडले त्यावेळीही तो शुध्दीवर होता. पोलीस कर्मचारी लोणकर यांनी चालत्या बसवर चढून खिडकीतून केबीनमध्ये जाऊन माने याला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला माझे काम करू दे, असे लोणकरला माने म्हणाला होता. पोलिसांनी पकडल्यानंतर नागरिक त्याला मारहाण करत होते. त्यामुळे पोलीस सुरक्षितस्थळी घेऊन जात होता. त्यावेळी माने याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यावरून संतोष माने याचे मानसिक संतुलन योग्य असल्याचे दिसून येते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

डॉ. दिलीप बुरटेंना जाब विचारणार
बचाव पक्षाच्या वतीने सोलापूर येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे आणि अमृत मेडिकलच्या शिवानंद शेटे यांना साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर करण्यात आले होते. डॉ. बुरटे यांनी संतोष माने मनोरुग्ण असून, मेब्रुवारी 2010 पासून माझ्याकडे उपचार घेत होता, अशी साक्ष दिली आहे. मात्र, घटना घडल्यानंतर वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलताना संतोष माने फक्त एकदाच माझ्याकडे आला होता. असे डॉ. बुरटे यांनी सांगितले होते. तसे वृत्तपत्रांमध्ये छापूनही आले होते. त्याचा जबाब डॉ. बुरटे यांना न्यायालय विचारणार आहे. एक महिना संतोष माने सुट्टीवर होता. याचा फायदा घेऊन तो मनोरुग्ण असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला. मात्र, त्याबाबतचाही ठोस पुरावा मिळाला नाही. अमृता मेडीकलच्या शिवानंद शेटे यांनीही न्यायालयात खोट्या औषधांच्या बिलांची कागदपत्रे सादर केली आहेत. डॉक्टरांनी जी औषधे लिहून दिलीच नाहीत. त्या औषधांची बिले त्यांच्याकडे कोठून आली

Leave a Comment