पुणे आरटीओत एक हजार एक हजार कोटीचा महसूल : पुण्यात वर्षात 13 लाख गाड्यांची नोंद

पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) – पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे व राज्यात दुष्काळही आहे. मात्र या दरवाढीचा परिणाम वाहन खरेदीवर फारसा झाला नसल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) वर्षभरात जमा झालेल्या महसुल आकडेवारी वरून दिसून येत आहे. यंदा महसुलात गतवर्षीच्या तुलनेत दोनशे कोटींची वाढ झाली असून पुणे विभागाने विक्रमी 1 हजार 52 कोटी रूपयांचा महसूल जमा केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अरूण येवला यांनी दिली.

पुणे प्रादेशिक परिवहन विभागातंर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापुर आरि ण अकलुज या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होतो. पुणे आरटीओ कडे दर महिन्याला सरसरी 4 हजार 215 कारची नोंदणी होते. पुणे आरटीओ कार्यालयात 1 एप्रिल 2012 ते 28 फेब्रुवारी 2013 दरम्यान 18 लाख 6 हजार 594 वाहनांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 13 लाख 5 हजार 261 दुचाकीं तर 43 हजार 28 चारचाकींचा समावेश आहे. वाहनांची नोंदणी, पसंती क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स, विविध प्रकारचे परवाने आणि करापोटी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला उपरोक्त पाच उपप्रादेशिक कार्यलयामधुन 1 हजार 52 कोटी 22 हजार रूपयांचे उत्पन्न 2012 – 13 या आर्थिक वर्षात मिळाले आहे. गतवर्षी ही रक्कम 850 कोटी 99 लाख 49 हजार होती असे येवला यांनी सािगतले.

आरटीओच्या उत्पन्नात मागील चार वर्षापासून सातत्याने वाढ होत असून चार वर्षात महसुलात अडीचपट वाढ झाली आहे. मागील वर्षी पुणे शहरात तब्बल 23 लाखाहून अधिक वाहनांची नोंदणी झाली. या वर्षी हा आकडा फेब्रुवारी महिन्यात वाहन विक्रिवर झालेल्या परिणामामुळे कमी झाला असला तरीही उत्पनावर त्याचा परिणाम झालेला नाही. यावर्षी सवाधिक उत्पन्न सोलापुर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ( 808 कोटी 1 लाख 77 हजार) आहे त्यानंतर बारामती कार्यालय (548 कोटी 6 लाख 52 हजार) आणि तिसर्‍या क्रमांकावर पुणे शहर कार्यालय आहे (546 कोटटी 91 लाख 23 हजार) असल्याचे येवला बोलूने दाखविले.

Leave a Comment